ऑडीपेक्षाही महाग असा 70 लाखांचा घोडा !

Sachin Salve

Your browser doesn't support HTML5 video.

04 नोव्हेंबर : दैनदिन जीवनामध्ये आपण लाखो रुपये किंमतीच्या ऑडी, मर्सिडीज्, बीएमडब्लू सारख्या देशी अन् परदेशी बनावटीच्या महागड्या कार वापरणारे अवलिया पाहिले असतील. पण या कारच्या किंमती इतक्या नोटा देवून काही हौशी मंडळी घोडे खरेदी करतात असे जर तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही.

पण सोलापुरातल्या अकलूजच्या घोडेबाजारात ऑडीपेक्षाही भारी किंमतीच्या घोड्यांची विक्री होतेय. अकलूजमध्ये सुरू असलेल्या घोडेबाजारात सुरू असलेल्या बाजारात एक दोन लाख नव्हे तर तब्बल 70 लाख रुपये किंमतीच्या घोड्याची खरेदी विक्री होत आहे.

माने देशमुख यांचा मालकीचा असलेल्या घोड्याची किंमत ही 70 लाखांच्या घरात पोहचली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now