कोणता हा झेंडा घेऊ हाती !

Sachin Salve

20 सप्टेंबर : 'कोणता हा झेंडा घेऊ हाती' अशी अवस्था आता कार्यकर्त्यांची झालीय. सर्वच पक्षांचं जागावाटपाचं गुर्‍हाळ सुरूच आहे. मतदानाला महिन्याभरापेक्षाही कमी वेळ राहिलाय. जागावाटपाच्या घोळामुळे अजून उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत.

त्यामुळे नेमका कोणाचा प्रचार करायचा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय. त्यामुळे स्थानिक पातळीवरची पक्ष कार्यालयं ओस पडली आहेत. वर्ध्यात तर भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे या सर्वच पक्षांची कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसतोय.

दिल्लीपासून मुंबईपर्यंत जागावाटपांच्या चर्चांचं गु-हाळ सुरू आहे. महायुतीतला तिढा संपायचं नाव घेत नाही तर आघाडीतही अजून बिघाडी कायम आहे. मतदानाला आता एक महिन्यापेक्षा कमी वेळ उरला असतानाही जागावाटपाच्या घोळामुळे अजून उमेदवारी अर्जही दाखल झालेले नाहीत. त्यामुळे नेमका उमेदवार कोण आणि कुणाचा प्रचार करायचा या संभ्रमात कार्यकर्ते सापडले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या

स्थानिक पातळीवरची कार्यालयांत शुकशुकाट दिसून येतोय. वर्ध्यात तर याचं बोलकं उदाहरण समोर आलंय. शहरातील प्रमुख पक्षांची कार्यालयं ओस पडली आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना कार्यालयात कार्यकर्तेच दिसत नाहीत. कारण प्रचार कुणाचा करायचा अशा संभ्रमात ते सापडले आहेत. आता ते वाट बघतायत ते मुंबईहून येणार्‍या आदेशाची...

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now