मला वाटलंच होतं आपण जिंकणार आणि आपण जिंकलोच- सचिन

Samruddha Bhambure

22  जुलै :  क्रिकेटची पंढरी लॉर्डस्‌वर भारतानं कसोटी सामन्यात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा आनंद इतर लाखो भारतीयांप्रमाणेच भारतरत्न सचिन तेंडुलकरलाही झाला आहे. क्रिकेटमधून निवृत्त झालेला सचिन त्याच्या मुंबईतल्या वांद्र्याच्या घरी बसून पहिल्या दिवशीपासून हा कसोटी सामना पाहत होता. तब्बल 28 वर्षांनंतर भारतानं लॉर्डस्‌वर विजय मिळवला आहे. क्रिकेटच्या पंढरीत भारतानं 95 धावांनी मिळवलेल्या विजयानंतर उड्या मारून सचिननं हा आनंद साजरा केला.

दैनिक लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत सचिनला आपला आनंद लपवता आला नाही. भारतीय क्रिकेट विश्वासाठी ही अभिमानास्पद गोष्ट असून या विजयानं मला वैयक्तिक खूपच आनंद झाल्याचं सचिनने म्हटलं. 'कसोटीच्या पहिल्याच दिवस भारताने गाजविला, तेव्हाच मी अर्जूनला भारत हा सामना जिंकणार, असे सांगितले होते आणि माझं भाकीत खरं. अजूनही मी आनंद साजरा करत असल्याचंही सचिन या वेळी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now