चंद्रपुरात बिबट्यांचा धुमाकूळ, एक जखमी

Sachin Salve

Your browser doesn't support HTML5 video.

21 एप्रिल : बिबट्या विरुद्ध माणसं असा संघर्ष पुन्हा एकदा चंद्रपूरमध्ये पाहण्यास मिळाला. चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर गावात आज (सोमवारी) सकाळी आठच्या सुमाराला एक बिबट्या संतोषी माता वॉर्ड भागातील एका घरात घुसला. हा बिबट्या घरात शिरल्याने घरातले लोक आणि या भागातल्या लोकांची एकच पळापळ झाली. 4 तास या बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. वनविभाग आणि वन्यजीव पथक त्या ठिकाणी पोहचल्यानंतर या बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले त्यावेळी या बिबट्याने घराच्या गच्चीवरून वन्यजीव पथकावर हल्ला केला. त्यात एक जण जखमी झाला. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलंय आणि वन्यजीव विभागाचे अधिकारी आता या बिबट्याला जंगलात सोडून देणार आहेत. तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात नवगाव सब फॉरेस्ट झोनमधल्या आलेसुर गावात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे 5 वर्षाचा हा बिबट्या विहिरीत पडलेला होता, विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेला हा बिबट्या दिसला. त्यानंतर या बिबट्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. पण वनविभागानं केलेल्या मोठ्या प्रयत्नानंतरही या बिबट्याला वाचवण्यात अपयश आलंय. विहिरीतून बाहेर काढताना त्याचा मृत्यू झाला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now