भुसावळमध्ये बिबट्याला ठेचून मारले

Sachin Salve

Your browser doesn't support HTML5 video.

26 फेब्रुवारी : ग्रामस्थांवर जीवघेणा हल्ला करणार्‍या बिबट्याला ठेचून मारल्याची घटना भुसावळ येथील ओझरखेडा आणि बेलखेडा या गावात घडली. संतप्त गावकरी एवढ्यावर थांबले नाही तर मृत बिबट्याला जाळण्याचा प्रयत्न केला पण ऐनवेळी वनविभाग आणि पोलीस हजर झाल्यामुळे बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.

जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा आणि बेलखेडा या गावात आज सकाळी 11 च्या सुमारास बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला. या महिलेनं आरडाओरड केल्यामुळे शेजारील शेतातील दोघे मदतीसाठी धावून आले. पण बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला चढवला. झालेला गोंधळ पाहून अन्य ग्रामस्थही मदतीसाठी धावून आले. गावकर्‍यांनी त्याचा पाठलाग करून त्याला एका शेतामध्ये घेरलं. घटनेची माहिती कळताच पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी दाखल झाले. बिबट्याला पळवून लावण्यासाठी पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडल्या. पण तरीही बिबट्या पळ काढायला तयार नव्हता. बिबट्याने पुन्हा गावकर्‍यांवर हल्ला केला यात 9 गावकरी जखमी झाले. मग संतप्त गावकर्‍यांनी बिबट्याला घेरुन लाठ्या-काठ्यांनी मार देऊन ठार केलं. इतकंच नाही, तर गावकर्‍यांनी बिबट्याचा मृतदेह वनविभागाच्या ताब्यात न देता त्याला परस्पर जाळून टाकण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांनी जमावाला शांत करून बिबट्याचा मृतदेह वन विभागाच्या ताब्यात दिला. जखमी 9 गावकर्‍यांवर वरणगावमध्ये उपचार सुरू आहे.

Trending Now