कोण होणार नवीन पोलीस आयुक्त ?

Samruddha Bhambure | News18 Lokmat

03 फेब्रुवारी : मुंबई पोलीस आयुक्तपदासाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद सध्या रिक्तच आहे. या पदाच्या नियुक्ती प्रक्रीया आता वेगाने सुरू आहे.

या पदासाठी सेवाजेष्ठतेनुसार ठाण्याचे पोलीस आयुक्त के.पी .रघुवंशी, महामार्ग पोलीस विभागाचे अतिरीक्त महासंचालक विजय कांबळे, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जावेद अहमद, अतिरिक्त पोलीस महासंचालक सतीश माथुर यांची नावं चर्चेत आहेत.

या पदासाठी राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारीया हे ही इच्छुक असले तरी सेवाजेष्ठते नुसार ते सहाव्या क्रमांकावर येतात.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण?

1. के. पी. रघुवंशी, पोलीस आयुक्त, ठाणे2. विजय कांबळे, अतिरिक्त पोलीस महासंचालक3. सतीश माथुर, अतिरिक्त पोलीस महासंचालक4. राकेश मारिया, प्रमुख, ATS

Trending Now