वडापावमध्ये आढळलं पालीचं मेलेलं पिल्लू

मात्र वडापाव खाताना त्यात मेलेली पाल आढळून आली.

अंबरनाथ, 23 आॅगस्ट : मुंबईची ओळख असलेल्या मुंबईचा वडापाव हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ...मुंबईत कुठेही गेलं तर सहज कुठेही वडापाव मिळणारच...पण तुम्ही जो वडापाव खातायत त्यात पाल तर नाही ना ?, असा प्रश्न यासाठी विचारतोय की, अंबरनाथमध्ये वडापावमध्ये चक्क मेलेली पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकारानंतर ग्राहकांनी थेट वडापाव विक्रेत्यांचे दुकान गठीत त्याला जाब विचारला आहे.अंबरनाथ पूर्व भागातल्या स्टेशन परिसरात बबन वडापाव हा नामांकित वडापाव विक्रेता आहे. त्याच्या दुकानात हा प्रकार समोर आलाय. याच भागातल्या एका कार्यालयात काम करणाऱ्या अल्पा गोहिल या तरुणीने आज सकाळच्या सुमारास ऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी म्हणून इथून वडापाव नेले.मात्र वडापाव खाताना त्यात मेलेली पाल आढळून आली. त्यामुळे गोहिल यांनी पुन्हा दुकानात धाव घेतली असता त्यांना कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे उत्तरं देत अक्षरशः हाकलून दिलं. त्यामुळं ग्राहकांनी तिथे गोंधळ घातला. यानंतर अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता तिथे बबन वडापाव या दुकानाचं फूड लायसन्स सुद्धा संपल्याचं समोर आलं.

दरम्यान,  वडयात पाल आढल्या प्रकरणी अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बबन वडापाव या दुकानाचा  मालक बबन पटेल आणि त्याच्या तीन कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसंच अंबरनाथ पालिकेच्या आरोग्य विभागाने वडयाचे सॅम्पल अन्न आणि औषध प्रशासनाकड़े पाठवले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील करवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलंय, तसंच शहरातील उघड्यावर खाद्य पदार्थ विक्रेत्यांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचं पालिकेने आरोग्य सभापती शशांक गायकवाड यांनी सांगितलं.VIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक

Trending Now