जगाला शॉपिंगची चटक लावणारा अलिबाबाचा जनक ५४ व्या वर्षीच का होतोय रिटायर?

काँप्युटर सायन्सची डिगरी नसलेला साधा शिक्षक ज्याला इंटरनेटचीही माहिती नव्हती, तो आशियातल्या सगळ्यात मोठ्या इ कॉमर्स कंपनीची स्थापना करतो आणि जगाला ऑनलाईन शॉपिंगची चटक लावतो. अलिबाबाच्या जॅक मा यांनी ५४व्या वर्षीच रिटायरमेंट जाहीर केली आहे. काय आहेत त्याची कारणं?

अॅमेझॉनला टक्कर देत अलिबाबा.कॉम ही जगातली सर्वांत मोठी ई कॉमर्स कंपनी होण्याच्या मार्गावर आहे. या अलिबाबाच्या चायनीज जन्मदात्यानं - जॅक मा यांनी मात्र ५४ व्या वर्षीच निवृत्ती जाहीर केलीय. अलिबाबा या जगातल्या बड्या ई-कॉमर्स कंपनीला जन्म देणारे कंपनीचे प्रमुख जॅक मा यांनी टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की १० सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते निवृत्त होणार आहेत. ते फक्त ५४ वर्षांचे आहेत. अलिबाबा ही आता चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी झाली आहे. आणि जॅक मा आशियातले सर्वांत श्रीमंत उद्योजक. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 3740०लाख डॉलर्स म्हणजेच 2.43 लाख कोटी रुपये इतकी आहे.

जॅक यांनी 1999मध्ये हांगझूच्या एका अपार्टमेंटमध्ये अलीबाबा कंपनीची सुरुवात केली. त्यावेळी त्यांचं काम पाहून लोकांनी त्यांना बिनकामाचा रिकामटेकडा माणूस समजत दुर्लक्ष केलं. बिल गेट्स किंवा स्टीव जॉब्सप्रमाणेच जॅक यांच्याकडे देखील कंप्युटर सायन्सची कुठलीच डिग्री नव्हती. १९८०मध्ये त्यांनी एका शाळेत शिक्षकाची नोकरी केली आहे. तान वर्षानंतर नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरू केली.  1994मध्ये जेव्हा ते त्यांच्या व्यवसायाशी संबंधित अमेरिकेत गेले होते तेव्हा त्यांनी पहिलांदा इंटरनेट पाहिलं आणि ते थक्क झाले. त्यानंतर चीनमध्ये 'मिस्टर इंटरनेट' या नावाने प्रसिद्ध झाले. शिक्षक म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जॅक यांना सुरुवातीच्या काळात अजिबात लक्षणीय यश मिळालेलं नव्हतं. अलिबाबाचं यशसुद्धा त्यांना सहजासहजी नाही मिळालेलं. तब्बल ३० नोकऱ्यांध्ये निराशा पदरी पडल्यानंतर त्यांनी अलीबाबा सुरू करण्याचं ठरवलं. 21 फेब्रुवारी 1999ला जॅक मा ने अलीबाबा या कंपनीची स्थापना केली आणि कंपनीत इन्व्हेस्ट करण्यासाठी त्यांनी 17 मित्रांना तयार केलं. सुरुवातीच्या अडचणींनंतर त्यांच्या कंपनीने वेगाने प्रगती सुरू केली. २०१३ पर्यंत ते अलिबाबाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर त्यांनी अध्यक्ष म्हणून या कंपनीचा कारभार सांभाळला. आणि आता सोमवारी ते त्यांच्या कामातून निवृत्ती घेणार आहेत.

Trending Now