Raksha Bandhan : 'दादा मागच्या वर्षी आला होता,आताही मी वाट पाहतेय'

'रक्षाबंधन'हा दिवस भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला आणखी घट्ट करण्याचा दिवस. देशातील सर्वच बहिणींसाठी हा खास दिवस असतो, मात्र देशाच रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांच्या बहिणी आजही 'राखी'घेऊन आपल्या भावाची पाणावलेल्या डोळ्यांनी वाट पाहतायत.

अकोला, कुंदन जाधव, 25 आॅगस्ट : 'रक्षाबंधन'हा दिवस भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला आणखी घट्ट करण्याचा दिवस. देशातील सर्वच बहिणींसाठी हा खास दिवस असतो, मात्र देशाच रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांच्या बहिणी आजही 'राखी'घेऊन आपल्या भावाची पाणावलेल्या डोळ्यांनी वाट पाहतायत.हे पाणावलेले डोळे, हातातील ही राखी घेऊन वाट पाहणारी बहीण, अकोल्यातील वीर जवान सुमेध गवईची धाकटी बहीण, गेल्यावर्षी जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत अकोल्याचे सुमेध गवई शहीद झाले होते. ते येणार होते. त्या आधीच त्यांना वीर मरण आलं. आणि संपूर्ण अकोला जिल्ह्यात शोककळा पसरली होती.लहानपणापासून भावाला राखी बांधणाऱ्या धाकट्या बहिणीचे हात.. तो भाऊ कधीच परतणार नाही, हे माहित असतानाही डोळ्यात अश्रू आणि हातात राखी घेऊन वाट पाहतायत. आई सोबत चिमुकलाही मामाचे फोटो नेहाळत असतो. देशासाठी भावाने दिलेल्या बलिदानाच या बहिणीला अभिमान आहे.

मी दरवर्षी भावाची रक्षाबंधनला वाट पाहते. माझा भाऊ देशासाठी शहीद झाला याचं दु:ख आहे पण अभिमानही आहे. मागच्या वर्षी रक्षाबंधनला माझा भाऊ घरी होता पण यावर्षी तो येणार नाही. पण तरीही मी माझ्या भावाची वाट पाहतेय असं सांगताना प्रीती क्षीरसाठ यांना अश्रू अनावर झाले.VIDEO : 'रॅम्बो' त्याच्याजवळ येऊन थांबला आणि खुनी सापडला

Trending Now