एकाच दिवसात मराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या

साहेबराव कोकणे/सुनील उंबरे, अहमदनगर, 10 सप्टेंबर : मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी अकरावीतील विद्यार्थिनीने महाविद्यालयातील हॉस्टेलमध्ये किशोरी बबन काकडे या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलीये. रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महाविद्यालयात ती अकरावीला सायन्स शाखेत ती शिक्षण घेत होती. आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षणासाठी माझे बलिदान देत असल्याचं म्हटलंय.किशोरी काकडे ही नगर तालुक्यातील कापूरवाडी या गावातील रहिवासी होती. तीन महिन्यांपूर्वी नगरमधील राधाबाई काळे महाविद्यालयात अकरावी सायन्ससाठी तीने प्रवेश घेतला होता. महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती. दुपारी ती क्लास अर्धवट सोडून हॉस्टेलच्या रुममध्ये गेली. फॅनला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. दुपारी तीन वाजता आत्महत्या केल्याचं उघडकीस आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

तिच्या रुममध्ये एक चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीत ‘मला दहावीत ८९ टक्के गुण मिळवून अनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला नाही. चांगले गुण असून, ही विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घ्यावा लागला. त्यासाठी आठ हजार रुपये भरावे लागले, त्यामुळे मी आत्महत्या करत आहेत’ असं म्हटलंय. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केलेली आहे. आर्ई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, असं चिठ्ठीत म्हटलंय. मात्र, पोलिसांनी चिठ्ठी दाखवण्यास नकार दिलाय.तर पंढरपुरमध्ये आरक्षण आणि नोकरी मिळत नाही म्हणून एका तरुणाने आत्महत्या केलीये.मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणि नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही आदी कारणांनी नैराश्य आलेल्या अमोल विष्णु कदम या 30 वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी अमोलने चिठ्ठी लिहिली आहे. यात अमोलने, 'मला नोकरी नसल्यामुळे माझे लग्न जमत नाही. आणि समाजाला आरक्षण नसल्यामुळे आत्महत्या करत आहे त्यास कोण जबाबदार नाही' असं या चिठ्ठीत लिहिलंय.PHOTOS : देशाचा प्रमुख हा राजा असावा, व्यापारी नसावा!;राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

Trending Now