डॉक्टरांच्या लक्झरी बसला भीषण अपघात, एक ठार तर 30 जखमी

मुंबईतील 'टाटा कॅन्सर' रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाला घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला पहाटे अहमदनगर शहराजवळ भीषण अपघात झालाय.

अहमदनगर, 01 सप्टेंबर :  मुंबईतील 'टाटा कॅन्सर' रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाला घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला पहाटे अहमदनगर शहराजवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात बसचालक अल्ताफ अहमद ठार झाला असून ३० डॉक्टर जखमी झाले आहेत. हे सर्व डॉक्टर मॅक्स केयर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, 3 गंभीर जखमी असून 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील 12 या महिला डॉक्टर्स आहेत.अहमदनगर शहराजवळील बायपासवर हा अपघात झाला. मुंबईहून औरंगाबादला कॉन्फरसला निघालेल्या बसमध्ये  ४० डॉक्टर होते. हे सर्व डॉक्टर कॅन्सर तज्ञ आहेत. रेडिएशन ओन्कलॉजी इतर वेगवेगळ्या विभागात ते कार्यरत आहेत. औरंगाबादमध्ये होणाऱ्या  मेडिकल कॉन्फरन्ससाठी ते निघाले होते. पहाटे चार ते साडेचारच्या वेळेस बायपासवरील नील हॉटेलसमोर डॉक्टरांची लक्झरी बस पाठीमागून एका कंटेनरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अर्ध्या गाडीचा चक्काचूर झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अल्ताफ अहमदचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे तर इतर 30 डॉक्टरांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

स्लॅब कोसळणारा तो थरारक VIRAL VIDEO कुठला ?

  

Trending Now