अजून वाढू शकतात पेट्रोल- डिझेलचे भाव, ही आहेत कारणं...

अमेरिकेला इराणवर दबाव ठेवायचा आहे. यामुळे भारताला कच्च्या तेलासाठी दुसऱ्या देशांवर अधिक किंमत देऊन अवलंबून राहावे लागत आहे.

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. निराशेची गोष्ट म्हणजे येत्या काळात या किंमती कमी होणार नसून वाढणार आहेत. विरोधी पक्ष काँग्रेसने डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या विरोधात आज सोमवारी भारत बंदचे आवाहन केले होते. मात्र सरकारने याबद्दल तेलाच्या किंमती अनेक आंतरराष्ट्रीय कारणांमुळे वाढल्या आहेत. शिवाय सरकार पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेल्या अतिरिक्त करावर कोणतीही सूट देण्याच्या तयारीत नाही. आम्ही तुम्हाला आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी का होत नाहीत याची कारणं सांगणार आहोत.डॉलरच्या तुलनेत रुपया घसरणेडॉलरच्या तुलनेत रुपया घसरून रुपयाची किंमत ७२.१२ रुपये एवढी झाली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण आहे. भारत लागणाऱ्या एकूण तेलापैकी ८० टक्के तेलाची आयात करतो. सर्वात जास्त तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा तिसरा नंबर लागतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जशी रुपयांची किंमत घसरत जाईल तशी आयात वस्तुंच्या किंमतीत वाढ होत जाणार. यामुळे पेट्रोल- डिझेलच्या रिटेल किंमतीही कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे वाढत जात आहेत.

जगभरात वाढत आहे कच्च्या तेलाच्या किंमतीअमेरिकेने इराणवर अनेक व्यापार निर्बंध घातले आहेत. अशात इराणची तेल निर्यात कमी झाली. इराणकडून जगाला मोठ्या प्रमाण तेल निर्यात केले जाते. इराणकडून सर्वात जास्त तेल आयात करण्यात भारत दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर चीन देश आहे. अमेरिकेने त्याच्या हितराष्ट्रांना गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून इराणकडून तेल आयात करण्यास मनाई केली. असे करुन अमेरिकेला इराणवर दबाव ठेवायचा आहे. यामुळे भारताला कच्च्या तेलासाठी दुसऱ्या देशांवर अधिक किंमत देऊन अवलंबून राहावे लागत आहे.रेव्हेन्यूचा सर्वात मोठा मार्ग आहे पेट्रोलपेट्रोल आणि डिजेल ज्या किंमतीत ग्राहकांना मिळत आहेत, त्या किंमतीत ५० टक्के सरकारचा कर असतो. उदाहरणार्थ इंडियन ऑइल जेव्हा डीलरला ३९.२२ रुपये दराने प्रती लीटर पेट्रोल विकते, त्यानंतर पेट्रोलवर डीलरचा नफा, राज्याचा वॅट आणि केंद्रीय उत्पादनाची किंमतही जोडली जाते. या सगळ्या किंमती जोडल्यानंतर ग्राहकांसाठी पेट्रोल प्रती लीटर ८० रुपये एवढे होते. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी सर्वात जास्त वॅट लावला जातो. यामुळेच संपूर्ण भारतात मुंबईमध्ये पेट्रोल- डिझेलच्या किंमती सर्वात जास्त आहेत.पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जीएसटीमध्ये मोडत नाहीत. यावर वॅट लावला जातो. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत जात आहे. राजस्थानने राज्याचा वॅट की करत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या.सरकारसाठी किती महत्त्वाचा आहे पेट्रोल आणि डिझेलपासून मिळणारा करफायनानशियल एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, गेल्या वर्षी केंद्र सरकारने ८ लाख कोटी रुपये एक्साइज ड्युटी, सर्विस टॅक्स आणि जीएसटीमधून मिळवला होता. यातील ३६ टक्के टॅक्स हा पेट्रोलियम सेक्टरमधून मिळाला होता.

Trending Now