JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / मोठी बातमी! आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी No Test; केंद्र सरकारचा नवा प्लान

मोठी बातमी! आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी No Test; केंद्र सरकारचा नवा प्लान

केंद्राच्या या नव्या योजनेविषयी तुमचीही प्रतिक्रिया नोंदवा..

0107

आतापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचं म्हणजे मोठं संकट समोर उभं राहत होते. आरटीओच्या कार्यालयात जाऊन परिक्षकासमोर गाडी चालवून दाखवताना अनेकांची दमछाक व्हायची. मात्र आता हा प्रश्न सुटणार

जाहिरात
0207

अनेकदा ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी दलालांच्या घशात मोठी रक्कम घालावी लागत होती. मात्र सरकारने आरटीओतून अनेक प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवायला सुरुवात केली. आता यात आणखी बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
0307

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात एक तरतूद केली आहे. यानुसार गाडीचा परवाना हवा असल्यास आता कोणालाही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज पडणार नाही.

जाहिरात
0407

मिळालेल्या माहितीनुसार यापुढे ड्रायव्हिंग सेंटरवरुन प्रशिक्षण घेतल्यानंतर कोणालाही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना टेस्ट द्यावी लागणार नाही.

जाहिरात
0507

यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून या योजनेवर विचारविनिमय सुरू आहे. यासंदर्भात मंत्रालयाने अधिसूचना जारी केली असून यावर लोकांच्या प्रतिक्रियाही मागवल्या जात आहे.

जाहिरात
0607

या योजनेनुसार ड्रायव्हिंग सेंटर्सना मंत्रालयाकडून मान्यता दिली जाईल. मात्र यामध्ये सेंटर्सना मंत्रालयाचे नियम पाळणे अनिवार्य असणार आहे.

जाहिरात
0707

तुम्हाला यासंदर्भात आपलं मत व्यक्त करावयाचे असल्यास केंद्रीय रस्ते व वाहतूक या संकेतस्थळावर तुम्ही प्रतिक्रिया नोंदवू शकता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या