नीरव मोदीच्या कंपनीत अभिषेक सिंघवींचा व्यवहार, निर्मला सीतारमण यांचा आरोप

Sachin Salve
17 फेब्रुवारी : नीरव मोदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी नीरव मोदीचा संबंध काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांच्याशी जोडलाय.नीरव मोदींची एक कंपनी आणि सिंघवी यांच्या कुटुंबामध्ये व्यवहार झाल्याचा आरोप सीतारमण यांनी केलाय. नीरव मोदींची एक कंपनी फायर स्टार डायमंड इंटरनॅशनल ही अद्वैत होल्डिंगकडून घेण्यात आली आणि सिंघवींच्या पत्नी अनिता सिंघवी या अद्वैत होल्डिंगच्या २००२ पासून भागीदार होत्या, असा आरोप सीतारमण यांनी केलाय.दरम्यान, काँग्रेसनं सीतारमण यांचे आरोप फेटाळून लावले आहे. सीतारमण यांच्याविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा सिंघवी यांनी दिलाय.

Trending Now