अमेरिकेच्या बलाढ्य वॉलमार्टनं 1 लाख कोटीला विकत घेतली फ्लिपकार्ट कंपनी

अमेरिकेच्या रिटेल बाजारातली बलाढ्य कंपनी वॉलमार्ट भारतातली ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी करणार आहे. ही डील पक्की झाली असून त्याची किंमत तब्बल 1 लाख कोटी एवढी असणार आहे.

Renuka Dhaybar
10 मे : अमेरिकेच्या रिटेल बाजारातली बलाढ्य कंपनी वॉलमार्ट भारतातली ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी करणार आहे. ही डील पक्की झाली असून त्याची किंमत तब्बल 1 लाख कोटी एवढी असणार आहे. वॉलमार्टचे सीईओ डॅग मॅकमिलन फ्लिपकार्टच्या बंगळूर इथल्या मुख्यालयात याची घोषणा करणार आहेत. वॉलमार्ट फ्लिपकार्टचे 70 टक्क शेअर्स खरेदी करणार आहे.ई कॉमर्सच्या जगातला हा सर्वात मोठा सौदा असल्याची माहिती आहे. जगात ई कॉमर्सचं क्षेत्र सर्वात जास्त वेगानं वाढणारं क्षेत्र असून या क्षेत्रातली सर्वात मोठी कंपनी अॅमेझोनला टक्कर देण्यासाठी वॉलमार्टनं हा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळं अॅमेझोनला मोठा धक्का बसला आहे. या आधी अॅमेझोननं भारतातली ई कॉमर्स क्षेत्रातली कंपनी पै खरेदी केली होती. भारतात ई कॉमर्सच्या क्षेत्रात झपाट्यानं वाढ होत असून त्याची उलाढाल 21 बिलियन डॉलरवर गेली आहे. इंटरनेट धारकांची संख्याही विक्रमी वेगानं वाढत असल्यानं भारतातलं ई कॉमर्स हे क्षेत्र जगभरातल्या गुंतवणूक कंपन्यांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे.

सचिन बंसल आणि बिन्नी बंसल यांनी 2007 मध्ये फ्लिपकार्टची स्थापना केली होती. ऑनलाईक पुस्तक खरेदीपासून सुरू झालेल्या फ्लिपकार्टवर आज अनेक वस्तू खरेदी करता येतात. 

Trending Now