त्यांनी आमदार कोंडून ठेवले नसते तर आमचंच सरकार आलं असतं-अमित शहा

कर्नाटकात बहुमत चाचणीत अपयशी झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.

Sachin Salve
 नवी दिल्ली, 21 मे : कर्नाटकमध्ये भाजपचा हा सर्वात मोठा पक्ष आहे. आम्ही सत्तास्थापनेसाठी घोडेबाजार केला नाही. पण काँग्रेस आणि जेडीएसने अभद्र युती करून सरकार स्थापन केले अशी टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. तसंच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमदार कोंडून ठेवले नसते तर आमचं सरकार नक्की आलं असतं असंही शहांनी सांगितलं.कर्नाटकात बहुमत चाचणीत अपयशी झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. काँग्रेस कशाचा जल्लोष साजरा करत आहे. यांचा मुख्यमंत्री एका ठिकाणी हरला, अर्धे मंत्री हरले, याचा हा जल्लोष करत आहे का ? , जेडीएसचे 37 आमदार निवडून आले, पण कित्येक उमेदवारांचं डिपाॅझिटही जप्त झालं याचा जेडीएस आनंद साजरा करत आहे असा सवाल करत अमित शहांनी काँग्रेस-जेडीएसवर हल्लाबोल केला.

कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसला नाकारून भाजपला जनादेश दिला होता. आम्ही पोटनिवडणूकमध्ये 9 ठिकाणी हरल्याचा आनंद व्यक्त करत काँग्रेस प्रचार करतंय पण आम्ही यांना 14 राज्यात हरवलं त्याचं कायअसा सवालही अमित शहांनी उपस्थितीत केला.तसंच कर्नाटकात आम्ही घोडेबाजार केला नाही. कोणत्याही आमदाराला पैशाचे आमिष दिले नाही. उलट काँग्रेस आणि जेडीएसने आपले आमदार हाॅटेलमध्ये डांबून ठेवले, अजूनही आमदार हाॅटेलमध्येच आहे.  फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मजा करायला आमदार कोंडून ठेवले नसते तर आमचं सरकार नक्की आलं असतं, जनतेनेच आमदारांना कुणाला मतदान करायचं आहे याचा आदेश आमदारांना केला असता असंही अमित शहांनी स्पष्ट केलं.काँग्रेस पराभूत होऊन सुद्धा त्यांनी जेडीएसला पाठिंबा दिला आणि अभद्र युती केली. काँग्रेसला अर्धवट विजयाने अचानक सुप्रीम कोर्ट, निवडणूक यंत्रणा सर्व चांगलं वाटू लागलंय. आता कृपया भविष्यात तरी सुप्रीम कोर्टच्या न्यायधिशांच्या विरोधात महाभियोग आणू नका असा टोलाही शहांनी काँग्रेसला लगावला.गोवा, मनिपूरमध्ये आम्ही सरकार स्थापन केले पण बहुमतासाठी काँग्रेसने तसा प्रयत्नच केला नाही अशी आठवणही त्यांनी करून दिली.2019 च्या लोकशभा निवडणुकीत भाजपच बहुमताने सरकार स्थापन करेल असा विश्वासही अमित शहांनी व्यक्त केला.

Trending Now