तडजोडीसाठी विजय मल्ल्याची भेट झालीच नाही-अरुण जेटली

अरुण जेटली यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडलीये.

नवी दिल्ली,12 सप्टेंबर : कर्जबुडव्या विजय मल्ल्याने देश सोडून जाण्याआधी आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती असा खुलासा केलाय. मात्र, अरुण जेटली यांनी विजय मल्ल्याचा दावा खोडून काढलाय. विजय मल्ल्याचं वक्तव्य धादांत खोटं आणि बिनबुडाचं आहे, माझी अशी कोणतीही भेट झाली नव्हती असा दावा जेटलींनी केलाय. देशाला 9 हजार कोटींचा चुना लावणाऱ्या विजय मल्ल्याच्या एका दाव्यानं देशभरात मोठी खळबळ उडालीये. आपण देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो असा खळबळजनक दावा विजय मल्ल्यानं लंडन कोर्टाबाहेर केला. 2 मार्च 2016 ला मल्ल्यानं भारत सोडून पलायन केलंय. आज विजय मल्ल्या वेस्टमिंस्टर कोर्टात प्रत्यार्पण प्रकरणी हजर झाला होता. यावेळी एनआयए या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींशी बोलताना मल्लाने खळबळजनक दावा केला.

यावर अरुण जेटली यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडलीये. "तडजोडीच्या प्रस्तावासंदर्भात माझी भेट घेतल्याचं वक्तव्य लंडनमध्ये असलेल्या विजय मल्ल्यानं प्रसारमाध्यमांना दिलं. हे वक्तव्य धादांत खोटं आणि बिनबुडाचं आहे. 2014 पासून मी त्याला भेटण्यासाठी कधीही अपॉईंटमेंट दिलेली नाही, त्यामुळे त्याला भेटण्याचा प्रश्नच उद‌्भवत नाही. विजय मल्ल्या राज्यसभेचा सदस्य होता.

एके दिवशी मी माझ्या कक्षाकडे जात असताना मल्ल्या पळत आला आणि त्यानं माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मी तडजोडीचा प्रस्ताव सादर करत असल्याचं त्यानं सांगितलं. याआधीच्या मल्ल्याच्या निष्फळ आणि बिनकामाच्या प्रस्तावाचा अनुभव असल्यानं मी त्याच्याशी संवाद साधण्याचं आवर्जून टाळलं. आपण संवाद साधण्यात काहीच अर्थ नसून तुम्हाला जी काही ऑफर द्यायची आहे ती बँकेला द्या असं मी मल्ल्याला निक्षून सांगितलं."-अरुण जेटली

अरूण जेटली यांचं पत्रक

============================================================================ VIDEO : आतापर्यंत कधी न पाहिलेले धावत्या रेल्वेखाली तरुणाचा भयंकर स्टंट

Trending Now