गुरुद्वाऱ्यामध्ये मुस्लिम तरुणाने केली नमाज अदा !

27 आॅगस्ट : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नाही. कधी हसवणाऱ्या गोष्टी शेअर होतात तर कधी अफवांनीही पेव फुटतो. पण एक अशी घटना घडलीये ज्या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. हा व्हिडिओ मलेशियातील एका गुरुद्वाऱ्यातला आहे. गुरुद्वाऱ्यात एक मुस्लिम व्यक्ती नमाज अदा करतोय. विशेष म्हणजे गुरबानी सुरू असताना या मुस्लिम व्यक्तीने नमाज अदा केलीये.हा व्हिडिओ शिखइनसाईड या फेसबुकवर पोस्ट करण्यात आलाय. हा व्हिडिओ सामाजिक सलोख्याचं जिवंत उदाहरण आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी या व्हिडिओला शेअर केलंय. तब्बल 60 हजारांहुन अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय.

/www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FSikhInside%2Fvideos%2F704077899954653%2F&show_text=0&width=261" width="261" height="476" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true">मलेशिया हा एक मुस्लिम बहुल देश आहे आणि इथं इतर धर्माची लोकंही मोठ्या प्रमाणावर राहतात. 2011 च्या जनगणनेनुसार 60 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही इस्लाम धर्माची आहे. काही लोकांनी हा व्हिडिओ शेअर करून आनंद व्यक्त केलाय. तर काही लोकांनी हा व्हिडिओ मलेशियातीलच आहे असा दावा केलाय. या पोस्टमध्ये, 'एक मुस्लिम बांधव गुरुद्वाऱ्यामध्ये नमाज अदा करतोय, जवळपास कोणतीही मस्जिद मिळाली नाही म्हणून ते इथं नमाज अदा करण्यासाठी आले' असा मजकूर लिहिलाय.

नमाज अदा केल्यानंतर हा व्यक्ती शांतपणे गुरुद्वाऱ्यातून बाहेर गेला. व्हिडिओ शेअर करणाऱ्यांमध्ये काही लोकांनी या व्यक्तीला नमाज अदा करण्यासाठी गुरुव्दाऱ्यात येण्यापासून का रोखले नाही असा सवालही काही महाभागांनी उपस्थितीत केला.फाटलेल्या नोटा बदलण्याचा सोपा उपाय, 'RBI'ने सांगितले हे चार नियम

Trending Now