उपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार

महाभियोगाची नोटीस फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा काँग्रेसनं केली आहे. त्यामुळं हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

Ajay Kautikwar
नवी दिल्ली,ता.23 एप्रिल: महाभियोगाची नोटीस फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा काँग्रेसनं केली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ज्येष्ठ वकिल आणि घटनातज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर सोमवारी सकाळी हा निर्णय दिला होता.काँग्रेसचे नेते आणि प्रसिद्ध वकिल कपील सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन उपराष्ट्रपतींच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. हा निर्णय घटनाविरोधी आणि बेकायदा आहे. नायडू यांनी तांत्रिक गोष्टी जमजून घेण्यासाठी काही वकिलांशी बोलायला पाहिजे होतं असंही ते म्हणाले.तोपर्यंत मिश्रांच्या कोर्टात जाणार नाही

सरन्यायाधीश दिपक मिश्रा जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत त्यांच्या कोर्टात पाय ठेवणार नाही अशी घोषणा कपील सिब्बल यांनी केलीय. मिश्रा निवृत्त होईपर्यंत आपली ही घोषणा कायम असेल असही ते म्हणाले. 

Trending Now