महाभियोगाची नोटीस फेटाळण्याचा निर्णय घाईत नाहीतर पूर्ण विचारांती - नायडू

महाभियोगाची नोटीस फेटाळणं हा घाई घाईत घेतलेला निर्णय नाही तर पूर्ण विचारांती घेतलेला निर्णय असल्याचं स्पष्टीकरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिलं.

Ajay Kautikwar
नवी दिल्ली,ता.24 एप्रिल: महाभियोगाची नोटीस फेटाळणं हा घाई घाईत घेतलेला निर्णय नाही तर पूर्ण विचारांती घेतलेला निर्णय असल्याचं स्पष्टीकरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिलं.काँग्रेस आणि अन्य विरोधीपक्षांनी शुक्रवारी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांना सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या विरोधात महाभियोगाची नोटीस दिली होती. मिश्रा यांच आचरण हे पदाला साजेसं नसून नियमांची पायमल्ली करणारं असल्याचं त्यात म्हटलं होत.नोटीस यायच्या आधीपासून मी या विषयावर घटनातज्ज्ञ, ज्येष्ठ विधिज्ञ, माजी न्यायमूर्ती आणि लोकसभेचे माजी महासचिव यांच्याशी सल्लामसलत करत होतो. सर्वांची मतं, नियम आणि घटनेतल्या तरतूदी या सर्वांचा विचार करूनच मी निर्णय घेतला आणि त्यामुळं मी समाधानी आहे असंही व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं.

काय मत आहे दिग्गज वकिलांचं?सोली सोराबजी : उपराष्ट्रपतींच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं तर ते टिकणार नाही. या नोटीशीत त्यांना गुणवत्ता आणि दर्जा दिसला नाही त्यामुळं त्यांनी नोटीस फेटाळून लावली.फली नरिमन : उपराष्ट्रपतींचा निर्णय योग्यच आहे. नोटीशीमध्ये अगदीच किरकोळ मुद्दे होतो. विरोधकांची नोटीस ही दिपक मिश्रांविरोधातली नाही तर ती सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी आहे. हे घडायला नको होतं.राम जेठमलानी : विरोधकांच्या नोटीशीत काहीही अर्थ नव्हता. दोन दशकांपूर्वीचे मुद्दे त्यात उकरून काढण्यात आले होते. जे झालं ते अत्यंत वाईट झालं. मीही अनेकदा वाद घातले मात्र एवढ्या खालच्या पातळीवर कधीच प्रकरण गेलं नाही.हरिश साळवे : जे घडलं ते अत्यंत वाईट आहे. माझ्या 40 वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं. न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांना थेट तुरूंगातच धाडलं पाहिजे. माफीही यासाठी पुरेशी नाही. 

Trending Now