महाभियोगाची नोटीस, लवकरच होणार निर्णय, उपराष्ट्रपतींची घटनातज्ज्ञांशी चर्चा

सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या विरूद्ध काँग्रेस आणि इतर पक्षांनी दिलेल्या नोटीशीवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू लवकरच निर्णय घेण्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

Ajay Kautikwar
नवी दिल्ली,ता.22 एप्रिल: सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या विरूद्ध काँग्रेस आणि इतर पक्षांनी दिलेल्या नोटीशीवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू लवकरच निर्णय घेण्याची माहिती सुत्रांनी दिलीय.घटनातज्ज्ञ सुभाष कश्यप, माजी कायदे सचिव पी.के. मल्होत्रा आणि अन्य ज्येष्ठ वकिल आणि माजी न्यायाधीशांची नायडू चर्चा करत आहे. महाभियोगाची नोटीस आल्यावर सांगोपाग चर्चा, पुराव्यांचा अभ्यास करून उपराष्ट्रपती नोटीस स्विकारायची की नाही याचा विचार करतात किंवा नोटीशीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमतात.नोटीस स्विकारली नाही तर काय करता येईल याचे पर्यायही विरोधी पक्षांकडून तपासले जात आहेत. शुक्रवारी काँग्रेसह सात पक्षांनी महाभियोगाची नोटीस दिली होती.

Trending Now