व्यापाऱ्याचा केला 'बकरा', हाती सोपवला कुत्रा !

21 आॅगस्ट, कानपूर : उत्तरप्रदेशमधील कानपूरध्ये एक चक्करावून सोडणारी घटना घडलीये. एका व्यक्तीला कुत्रा देऊन बकरा नेण्याची घटना घडलीये. कुत्र्याने भुकल्यानंतर आपली फसगत झाल्याचं कळल्यानंतर अशरफ नावाच्या व्यक्तीने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आलीये.मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या जाजमऊ चुंगी इथं बाजारात बकरी ईद निमित्ताने बोकड विकले जात होते. अशरफ हा आपले बोकड विकण्यासाठी आला होता. त्यावेळी एका व्यक्तीने आपला कुत्रा देऊन बोकड खरेदी केला. हा कुत्रा अगदी हुबेहुब बोकड्यासारखा होता. अशरफला जोपर्यंत कळायलं तोपर्यंत तो व्यक्ती पसार झाला होता.काही वेळानंतर दोरखंडाला बांधलेल्या कुत्र्याने भोंकणे सुरू केलं तेव्हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर अशरफने पोलिसात धाव घेतली. चकोरी पोलीस स्टेशनमध्ये त्याने तक्रार दाखल केली. पोलीसही या प्रकारामुळे गोंधळून गेले. पोलिसांनी बाजारात जाऊन पाहणी केली असता त्यांना असा कोणताही प्रकार आढळला नाही.

VIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक

Trending Now