Video: चार मुलांनी मिळून अल्पवयीन मुलीची काढली छेड, मोबाईलवर शूट केले चित्रण

आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती करत तिचा व्हिडिओही काढला

Your browser doesn't support HTML5 video.

झांसी, २४ जुलैः उत्तर प्रदेशमधील महिला आणि मुलांवरील अत्याचार काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. उत्तर प्रदेशमधील झांसी येथे १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती करत तिचा व्हिडिओही काढला. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अल्पवयीन मुलीवर चार मुलांनी जबरदस्ती केली. झांसीचे पोलीस अधिकारी विनोद कुमार सिंह यांनी याबद्दल माहिती देताना म्हटले की, हा व्हिडिओ १०- १२ दिवसांपूर्वीचा आहे. एक मुलगा अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करत होता. थोड्यावेळाने त्याचे काही साथिदार अजून आले. मात्र पीडितेच्या गावातील काही माणसं तिथे आली आणि त्यांनी पीडितेला मुलांच्या तावडीतून सोडवले.

Trending Now