उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सेंगरला सीबीआयने घेतलं ताब्यात

उत्तर प्रदेशच्या उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात अखेर अटक झाली आहे. भाजप आमदार कुलदिप सिंह सेंगरला सीबीआयनं अटक केलीये.

Renuka Dhaybar
13 एप्रिल : उत्तर प्रदेशच्या उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात अखेर अटक झाली आहे. भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयनं अटक केलीये. सेंगरला पहाटे साडे चार वाजता त्याच्या लखनऊच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. सध्या त्याला चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात नेण्यात आलं आहे.सेंगरवर पॉक्सोसह अनेक कायद्यांअतर्गत गुन्हे दाखल आहेत. पण अद्याप त्याला अटक होत नव्हती. त्यानंतर काल रात्री या प्रकरणावरून काँग्रेसनं गेट वे ऑफ इडियावर भाजप सरकारविरोधात मार्च काढला. देशभरातून टीकेची झोड उठल्यावर उत्तर प्रदेश सरकारनं गुरुवारी संध्याकाळी हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित केलं. त्यानंतर तातडीने या प्रकरणा संबंधीत सगळी कागदपत्र दिल्लीला पाठवण्यात आली आणि काही तासांत सेंगरला अटक झाली.जून २०१७ मध्ये आमदार आणि त्यांच्या भावांनी बलात्कार केल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे. ८ एप्रिल रोजी प्रकरणाचा योग्य तपास केला जात नसल्याचा आरोप करत तरुणीन योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसदेखील आरोपींना मदत करत असल्याचा आरोप तिने केला. धक्कादायक म्हणजे रविवारी पीडित तरुणीच्या वडिलांना अटक करण्यात आली. सोमवारी पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, कुलदीप सेंगरवर पॉक्सोसारखे गुन्हे दाखल असताना उत्तर प्रदेशचे पोलीस मात्र सिंगरला माननीय म्हणून त्याचा आदर-सन्मान करतात. या सगळ्यामुळे माणुसकीचा तर गळा दाबलाच आहे पण आपल्या वर्दीचं महत्त्व ही हे पोलीस विसरले आहे. 

Trending Now