कारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा

'कारागृहातील जेवण जेवल्यावर मला चक्कर आली. मी बाहेरून काहीही मागवले नव्हते. माझ्या जिवाला धोका आहे.'

Renuka Dhaybar
24 एप्रिल : शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने कारागृहात आपल्या जिवाला धोका असल्याचा खुलासा विशेष न्यायालयात सोमवारी केला. इंद्राणी नुकतीचं जे जे रुग्णालयातून उपचार घेऊन परतली आहे. त्यानंतर न्यायालयात इंद्राणीने हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे.'कारागृहातील जेवण जेवल्यावर मला चक्कर आली. मी बाहेरून काहीही मागवले नव्हते. माझ्या जिवाला धोका आहे. पण मी याबाबत कारागृह महानिरीक्षकाला काहीही माहिती दिली नाही,' असे इंद्राणीने न्यायालयाला सांगितले.पूर्वीही इंद्राणीने कारागृहात तिच्या जिवाला धोका असल्याचा दावा न्यायालयात केला होता. शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणीला २०१५मध्ये अटक करण्यात आलीय. स्वत:च्याच मुलीची संपत्तीसाठी हत्या केल्याचा आरोप सीबीआयने इंद्राणीवर ठेवला आहे. पण दरम्यान तिच्या या दाव्याची दखल घेतली जाणार का यावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

Trending Now