... अन् रक्षाबंधनला अटलजींना राखी बांधायचीच राहिली

प्रकृती अस्वास्थ्यामुळे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांनी आज १६ ऑगस्टला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण भारत शोकसागरात बुडाला आहे. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन या वाजपेयी यांना राखी बांधायच्या. पण नेमकी या रक्षाबंधनला वाजपेयींची उणीव सुमित्रा यांना जाणवेल यात काही शंका नाही. इंदूरच्या बहिणीवर अर्थात सुमित्रा महाजन यांच्यावर जेवढं वाजपेयी यांचं प्रेम होतं, तेवढंचे प्रेम ते इंदुरकरांवरही करायचे.

इंदूरमध्ये वाजपेयी यांचा चाहता वर्ग फार मोठ्या प्रमाणात होता. अनेक तरुण वाजपेयींच्या सह्या घेण्यासाठी त्यांच्याभोवती गर्दी करायचे. वाजपेयी यांना इंदूरचे जेवणही फार आवडायचे. तिथले वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी ते इंदूरला आवर्जुन जायचे. इंदूरकर अटल बिहारी वाजपेयींना विसरणे अशक्य

Trending Now