ग्वाल्हेरच्या राधा-कृष्णाला 100 कोटींच्या दागिन्यांचा साज

मध्यप्रदेशातल्या ऐतिहासिक ग्वाल्हेर शहरात असलेल्या प्राचिन कृष्णमंदिरातल्या मूर्तींना 100 कोटी रूपयांचे दागिने असून ते फक्त जन्माष्टमीलाच घातले जातात.

ग्वाल्हेर, ता. 2 सप्टेंबर : गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर देशभर उत्साहाचं वातावरण आहे. देशभरातल्या कृष्णमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असून कृष्णदर्शनासाठी भाविक आतूर झाले आहेत. भगवान श्रीकृष्ण हे सगळ्यांचं लाडकं दैवत. कृष्णाची कितीतरी रूपं गेली हजारो वर्ष भाविकांना भुरळ पाडत आहेत. तान्हा कृष्ण, बालकृष्ण, सखा कृष्ण, प्रेम करायला शिकवणारा कृष्ण, मार्गदर्शक कृष्ण, गीता सांगणारा कृष्ण आणि रणांगणावर अर्जुनाला लढायला भाग पाडणारा कृष्ण अशी कृष्णाची विविध रूपं भाविकांना आपलंसं करतात. मध्यप्रदेशातल्या ऐतिहासिक ग्वाल्हेर शहरात असलेल्या प्राचिन कृष्णमंदिरातल्या मूर्तींना 100 कोटी रूपयांचे दागिने असून ते फक्त जन्माष्टमीलाच घातले जातात.ग्वाल्हेरच्या फुलबाग परिसरात शिंदे सरकारच्या काळापासून हे मंदिर असून त्यात राधा-कृष्णाची सुंदर मूर्ती आहे. 97 वर्ष जुनं हे मंदिर आहे. त्या काळापासून या मंदिरातल्या मूर्तींना अत्यंत सुंदर असे दागिने आहेत. हिरे, माणिक,पाचू, अस्सल मोत्यांमध्ये हे दागिने मढवलेले आहेत.

 PHOTOS : जम्मू ते मुंबई 'जन्माष्टमी'चा देशभर असा होता उत्साह!

Trending Now