मला ज्याची भीती होती तेच झालं, प्रणवदांच्या बदललेल्या फोटोवर शर्मिष्ठा मुखर्जींची प्रतिक्रिया

कालच्या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर मुखर्जी यांचा फोटोशाॅप केलेला फोटो फिरतोय. त्यात ते संघाप्रमाणे अभिवादन करताना दिसतात.

Sonali Deshpande
08 जून : काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप सोहळा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला. भारताचा आत्मा सहिष्णुतेतच आहे. एका  धर्मामुळे भारताची वेगळी ओळख निर्माण होऊ शकत नाही असं माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या मंचावर स्पष्ट केलं. तरीही प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी अजूनही त्यांच्यावर नाराज आहेत. कालच्या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर मुखर्जी यांचा फोटोशाॅप केलेला फोटो फिरतोय. त्यात ते संघाप्रमाणे अभिवादन करताना दिसतात. त्यावर शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या, मला ज्याची भीती होती, तेच झालं.

मुखर्जी नागपूरला जाण्याआधीच  तुम्ही सांभाळू राहा आणि संघ तुमचा चुकीचा वापर करू शकते असा सल्लाच प्रणवदांची कन्या आणि काँग्रेसच्या नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला होताच.

Trending Now