तब्बल 20 हजार शार्क माशांची शिकार करणारी टोळी जेरबंद

तब्बल 20 हजार शार्क माशांची शिकार करून त्यांचे अवयव विकणाऱ्या एका टोळीला डीआरआयनं अटक केली आहे.

मुंबई, ता. 3 सप्टेंबर : तब्बल 20 हजार शार्क माशांची शिकार करून त्यांचे अवयव विकणाऱ्या एका टोळीला डीआरआयनं अटक केली आहे. मुंबईतील वसई आणि उत्तन परिसरातून त्याचप्रमाणे गुजरातच्याही काही ठिकाणाहून या टोळीच्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. या शार्क फिन्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 35 ते 40 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान हे मासे असल्याचं सांगून त्यांचे अवयव निर्यात केले जायचे. चीन आणि जपानसारख्या पूर्वेकडील देशांमध्ये शार्क माशांना मोठी मागणी आहे. शार्क माशांच्या शिकारीवर जगभरात बंदी आहे. आणि त्यामुळे हे अवयव मिळवण्यासाठी आधी त्यांचे फिन्स कापून त्यांना समुद्रात सोडलं जात होतं. त्यामुळे कालांतराने त्यांचा मृत्यू होत होता.असे उद्योग करणाऱ्यांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. भारत आणि अनेक विकसनशील देशांमध्ये हे रॅकेट बेसुमार माशांची कत्तल करत असतं. विविध औषधी उपयोग आणि खाण्यासाठी याचा वापर करतात. तर अनेक जण खोटी माहिती देवूनही या माशांच्या अवयवांची विक्री करत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर या उद्योगाची उलाढाल काही हजार कोटींमध्ये असून यात अनेक बडे मासे सामील आहेत. या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस आंतरराष्ट्रीय स्तरावरही मदत मागण्याची शक्यता आहे.शार्क मासा हा आकारमानाने मोठा असल्यानं त्याला पकडण्यासाठी जास्त साधनांची गरज असते. त्यामुळं ही टोळी यात प्रचंड पैसा ओतत असते. प्रचंड पैसा आणि गुंडगिरी करून स्थानिक मच्छिमार आणि प्रशासनाला हाताशी धरून ही टोळी भ्रष्ट मार्गाने आपलं काम करत असते. ही शिकार वेळीच रोखली नाही तर शार्क माशांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय.

VIDEO: मै हूँ डॉन...शिवेंद्रराजेंचा ठेका !

  

Trending Now