मध्यप्रदेशमध्ये पोलीस भरतीत उमेदवारांच्या छातीवर एससी एसटी लिहिलं; सर्वत्र खळबळ

काही दिवसांपूर्वी आरक्षित वर्गातील महिलांच्या भरती प्रक्रियेत गोंधळ झाल्याने पुरुषांच्या पोलीस भरतीत कडक व्यवस्था ठेवण्यात आली होती. यावेळी सीएमओ डॉ. पनिका यांनी सांगितलं की, सध्या जिल्हा रुग्णालयात उमेदवारांची वैद्यकीय चाचणी सुरु असल्याचं मला माहिती नव्हते

Chittatosh Khandekar
29एप्रिल:  मध्य प्रदेश राज्य अनेक वादग्रस्त कारणांनी सध्या चर्चेत येऊ लागले आहे. त्यातच पुन्हा एकदा प्रत्यय आला असून त्यावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत. पोलीस भरतीमध्ये आरक्षित जागांवरील निवड झालेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीदरम्यान, त्यांच्या छातीवर SC/ST असे लिहिण्यात आले आहे.धार जिल्ह्यामध्ये नुकतीच पोलीस भरती प्रक्रिया राबवली गेली. या भरतीमध्ये मैदानी चाचणीत निवड झालेल्या उमेदवारांची सध्या वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये आरक्षित वर्गातील उमेदवारांचाही समावेश आहे. या उमेदवारांची स्वतंत्र वर्गवारी सोपी व्हावी  यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने अजब मार्गाचा वापर केला. त्यांच्याकडून चक्क उमेदवारांच्या छातीवर SC/ST लिहिलं. मात्र, या प्रकारावरून आता रुग्णालय प्रशासनाला मोठ्या टीकेला सामोरे जावं लागत आहे.काही दिवसांपूर्वी आरक्षित वर्गातील महिलांच्या भरती प्रक्रियेत गोंधळ झाल्याने पुरुषांच्या पोलीस भरतीत कडक व्यवस्था ठेवण्यात आली होती. यावेळी सीएमओ डॉ. पनिका यांनी सांगितलं की, सध्या जिल्हा रुग्णालयात उमेदवारांची वैद्यकीय चाचणी सुरु असल्याचं मला माहिती नव्हते. मात्र, या चाचणीदरम्यान जर उमेदवारांच्या छातीवरच जातीचा शिक्का मारण्यात येत असेल तर जातीयवाद संपणार कधी असा प्रश्न विचारला जातोय. दोषींवर कारवाई होण्याची मागणी केली जाते आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक विरेंद्र सिंह म्हणाले, गेल्या वेळी भरतीदरम्यान, चुका झाल्यामुळे असं केल्याचं बोललं जातंयमध्य प्रदेशात अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत .भारत बंदला मध्य प्रदेशात उत्स्फुर्त प्रतिसाद तर मिळालाच होता त्याशिवाय दंगलीही झाल्या होत्या.

Trending Now