पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवल्या या ५५ महिलांना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खास रक्षाबंधनसाठी मोदी यांनी त्या ५५ महिलांना ट्विटरवर फॉलो केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रक्षाबंधनानिमित्त क्रीडा आणि मीडिया जगताशी निगडीत तब्बल ५५ महिलांना सोशल मीडियावर फॉलो करत त्यांना शुभेच्छा संदेश पाठवले. या ५५ महिलांमध्ये बॅडमिंटनपटू अश्विनी पोन्नप्पा, टेनिसपटू सानिया मिर्झा आणि कर्मन कौर थंडी, धावपटू पीटी उषा, माजी मिस इंडिया आणि बाल विकास अधिकारी स्वरूप, पत्रकार रोमाना इसार खान, श्वेता सिंह, पद्मजा जोशी, शीला भट्ट आणि शालिनी सिंह याचा समावेश आहे.पंतप्रधानांनी ट्विटरवर अभिनेत्री कोयना मित्रा, भारत्तोलक करनाम मल्लेश्वरी, फोटो पत्रकार रेणुका पुरी आणि भाजपच्या काही सदस्य आणि राज्य सरकारी महिला मंत्र्यांना फॉलो केले. त्यानंतर त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा पाठवल्या. पंतप्रधानांनी दिलोल्या शुभेच्छांचा स्वीकार करत सर्व महिलांनी पंतप्रधानांचे आभार मानत, त्यांनाही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खास रक्षाबंधनसाठी मोदी यांनी त्या ५५ महिलांना ट्विटरवर फॉलो केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांच्या खाजगी अकाऊंटवरून जवळपास २ हजार लोकांना फॉलो केले जात आहे.VIDEO : कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका

Trending Now