#News18RisingIndia : 2014 पासून आतापर्यंत 23000 अब्जाधीशांनी देश सोडला -रुचिर शर्मा

क्रिप्टोकरेंसीची धूम ही जास्त काळ टिकणार नाही, हा या प्रकारातला शेवटचा भाग असू शकतो त्यामुळे बिटकाॅईनमध्ये शक्यतो कुणीही गुंतवणूक करू नये

Sachin Salve
21 मार्च : न्यूज 18 रायझिंग इंडिया समिटमध्ये अर्थतज्ज्ञ आणि माॅर्गन स्टेनलीचे मुख्य जागतिक व्यवस्थापक रुचिर शर्मा यांनी भारतीय अर्थवस्थेबद्दल परखड मत व्यक्त केलं. भारताकडे संधी होती पण जागतिक आर्थिक प्रगतीचा फायदा घेता आला नाही, जगात 40 देशाची कार्यरत लोकसंख्या कमी झाली आहे. हे आर्थिक विकास दरासाठी मोठं नुकसान आहे असा इशारा शर्मा यांनी दिला.बिटकाईन सारखी क्रिप्टोकरेंसीत गुंतवणूक करायची असेल तर काळजी घेणारी बाब आहे. कारण क्रिप्टोकरेंसीची धूम ही जास्त काळ टिकणार नाही, हा या प्रकारातला शेवटचा भाग असू शकतो त्यामुळे बिटकाॅईनमध्ये शक्यतो कुणीही गुंतवणूक करू नये असा सल्ला शर्मा यांनी दिला.भारतात बेरोजगारीची समस्येवर रुचिर शर्मा म्हणतात, जगात बेरोजगारी मागील 40 वर्षांच्या तुलनेत कमी आहे, पण भारतात अजूनही नोकऱ्या कमी आहे.

भारतात फोफावत असलेल्या एफडीआयवर रुचिर शर्मा म्हणतात, "आज आपण जर दुबईला गेला तर तिथे तुम्हाला दिल्लीच्या एखाद्या हाॅटेलमध्ये जेवढी गर्दी पाहायला मिळणार नाही तितके भारतीय दुबईत पाहण्यास मिळतील. माझ्यासाठी भारत सदैव रायझिंग राहिला आहे."आपल्याकडे राजकारणाला खूपच जास्त महत्त्व देण्यात आलंय. मला असं वाटते की, निवडणुकांच्या आधारावर मार्केटचा निकाला काढला नाही पाहिजे. प्रत्येक निवडणूक ही मार्केटला प्रभावित करू शकत नाही. राजकारणाचा पाठलाग करणे हे आकर्षक असू शकते पण अर्थव्यवस्थेची गोष्ट वेगळी आहे असं रुचिर शर्मा यांनी स्पष्टपणे सांगितलं.2014 पासून आतापर्यंत 23000 अब्जाधीश लोकं देश सोडून पळून गेले आहे. मागील वर्षी 7000 अब्जाधीश देश सोडून गेले आहे. याआधी 400 लोकांनी देश सोडला होता. याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालाय कारण गुंतवणूक करण्यासाठी आपलीच माणसा देशात राहिलेली नाहीये. याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झालाय असं वास्तव्यही शर्मा यांनी मांडलं.

Trending Now