राहुल गांधींना संघाचं निमंत्रण? 'भारताचं भविष्य' कार्यक्रमात बोलण्याची विनंती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना संघाच्या व्यासपीठावर उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे.

नवी दिल्ली,ता. 27 ऑगस्ट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना संघाच्या व्यासपीठावर उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्याची शक्यता आहे. संघातर्फे सप्टेंबर महिन्यात 'भारताचं भविष्य' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. त्या कार्यक्रमासाठी सर्वच राजकीय पक्षांना बोलावण्यात येणार आहे. त्याच अंतर्गत राहुल गांधी यांनाही निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती संघाचे प्रवक्ते अरूण कुमार यांनी दिली. राजधानी नवी दिल्लीत 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान हा कार्यक्रम होणार असून राहुल गांधी निमंत्रण स्वीकारतात काय याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.या आधी माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या निमंत्रणाचा स्वीकार करून नागपूरात झालेल्या तृतीय संघ शिक्षावर्गाच्या समारोप समारंभाला हजेरी लावली होती. त्यावरून देशभर वादळही निर्माण झालं होतं. मात्र कुठल्याही टीकेची चिंता न करता मुखर्जी कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि राष्ट्रवादावर आपले विचार व्यक्त केले.गेली काही वर्ष राहुल गांधी सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वीच जर्मनीत असताना त्यांनी संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहुडशी केली होती. दोनही संस्थांची स्थापना 1920 मध्ये झाली आहे. मुस्लिम ब्रदरहुड ही अनेक अतिरेकी संघटनांना जन्म देणारी संघटना समजली जाते.त्यामुळं राहुल गांधींच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाली होती. भाजपने राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली होती. या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हे संघाचे स्वयंसेवक असताना राहुल गांधी एवढी चुकीची तुलना कशी काय करू शकतात अशी टीका भाजपने केली होती.

साखरपुड्यानंतर प्रियांका आणि निक अमेरिकेत करतायत एंजाॅय, फोटोज व्हायरल

Trending Now