मुलाच्या मृत्यूमुळे मी पुरती ढासळली, पण त्याला मिळणाऱ्या शौर्यचक्राचा आनंदच आहे, औरंगजेबच्या आईची प्रतिक्रिया

त्याच्या मृत्यूमुळे मी पूर्णपणे ढासाळले आहे. तो आज माझ्यासोबत नाही यामुळे मी अतीव दुःखात आहे

पूंछ, १५ ऑगस्ट- जम्मू- काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील रायफलमन औरंगजेब यांना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, औरंगजेबच्या आईने मुलाला मिळणाऱ्या गौरवाबद्दल आनंद व्यक्त केला. मात्र, त्याच्या मृत्यूमुळे मी पूर्णपणे ढासळली आहे. तो आज माझ्यासोबत नाही यामुळे मी अतीव दुःखात आहे, असं जड अंतःकरणाने औरंगजेबच्या आईने भावना व्यक्त केल्या. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथून औरंगजेबचे दहशतवाद्यांनी अपहरण करुन १४ जूनला त्याची हत्या केली. औरंगजेबला मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर करण्यात आले आहे. औरंगजेबचे ज्यावेळी अपहरण करण्यात आले तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात टॉर्चर करण्यात आले. या टॉर्चरचा व्हिडिओही समोर आला होता. औरंगजेब या जवानाला दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे मारहाण करुन त्याची हत्या केली होती.

व्हिडिओमध्ये त्याच्याकडून सैन्यासंदर्भात काही माहिती विचारण्यात येत होती. तसेच भारतीय सैन्यांकडून ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांबद्दल औरंगजेबला प्रश्न विचारण्यात आले होते. भारतीय लष्कराची पुढील रणनीती काय आहे? वसीम, तल्हा, समीर टायगर आणि इतर दहशतवाद्यांना कसे ठार केले? असे प्रश्न विचारल्यानंतर औरंगजेबची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.

Trending Now