जगाला हेवा वाटणार अशी असेल यंदाची प्रजासत्ताक दिनाची परेड! हे आहेत वैशिष्ट्ये

भारत यावर्षी आपला 69वा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहे. त्यासाठी जोरदार तयारीला सुरुवातही झाली आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदा 10 वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी परेडमध्ये सहभागी होणार आहेत.

Sachin Salve
नवी दिल्ली, 25 जानेवारी : भारत यावर्षी आपला 69वा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहे. त्यासाठी जोरदार तयारीला सुरुवातही झाली आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदा 10 वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी परेडमध्ये सहभागी होणार आहेत. यात ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, फिलिपींस, सिंगापूर, थायलंड आणि व्हियतनाम या देशांचा समावेश आहे.संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितलं की, भारताच्या या प्रजासत्ताक दिनी 10 प्रमुख पाहुण्यांच्या मदतीने आपली 'लुक ईस्ट' धोरण जगासमोर आणायचं आहे. या परेडचे मुख्य आकर्षण म्हणजे...लष्करी सामर्थ्याची झलक

- निर्भय क्षेपणास्त्र - ब्रह्मोस क्षेपणास्त्र - आकाश क्षेपणास्त्र- टी-90 टँक- बीएमपी - स्वाती रडार - भीष्म टी-90 चे मुख्य रणगाडे- पहिल्यांदाच देशाचे रुद्र हेलिकॉप्टर्स- पहिल्यांदाच स्वदेशी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र90 मिनिटांच्या परेड दरम्यान विविध राज्यांतील 23 वेगवेगळ्या रथांमधून भारतातील सांस्कृतिक विविधतेती झलक पहायला मिळणार आहे. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या महिला जवानांची खास मोटारसायकल प्रात्याक्षिक प्रदर्शित केली जाणार आहे. याशिवाय, 770 शाळांचे विद्यार्थी आसियान देशांची संस्कृती सादर करणार आहेत.या पाहुण्यांची खास उपस्थिती1) आंग सान सू की, राज्य सल्लागार (म्यानमार)2) जोको विडोडो, राष्ट्रपती (इंडोनेशिया)3) प्रयुत चान-ओ-चा, पंतप्रधान (थायलंड)4) हसनल बोलकिया, राजा (ब्रुनेई)5) हुन सेन, पंतप्रधान (कंबोडिया)6) ली सीन लूंग, पंतप्रधान (सिंगापूर)7) मोहम्मद नजीब, पंतप्रधान (मलेशिया)8) न्युन तंग जुंग, पंतप्रधान (व्हियतनाम)9) थोंगलोउन, पंतप्रधान (लाओस)10) रोड्रिगो दुतेर्ते, राष्ट्रपती (फिलिपींस)

Trending Now