ग्रेटर नोयडात 2 इमारती कोसळल्या, 3 जणांचा मृत्यू

मंगळवारी रात्री ग्रेटर नोयडाच्या शाहबेरी परिसरात दोन इमारती कोसळल्या आहेत. यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेश, 18 जुलै : मंगळवारी रात्री ग्रेटर नोयडाच्या शाहबेरी परिसरात दोन इमारती कोसळल्या आहेत. यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील एक इमारत चार मजली आणि  बांधकाम सुरू असलेली आहे तर दुसरी निर्माणाधीन ही इमारत सहा मजली असल्याची माहिती मिळतेय. या घटनेमध्ये 50 हून अधिक जण ढिगाऱ्याखाळी अडकली असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल करण्यात झाल्या आहेत. जखमींना ढिगाऱ्याखालून काढण्याचं काम सध्या सुरक्षा पथकाकडून करण्यात येत आहे.मुख्य अग्निशमन अधिकारी अरुणकुमार सिंह यांनी सांगितले की, शाहबेरी परिसरात 2 इमारती कोसळ्या आहेत. त्यात एक 4 मजली आणि निर्माणाधीन नावाची एक 6 मजली इमारत आहे. या दोन्ही इमारतीत अनेक कामगार काम करत होते. त्यांना आता ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. 

Greater Noida: A six-storey under-construction building has collapsed in Shah Beri village under Bisrakh police station limits. Several people are feared trapped. Police and rescue teams are present at the spot. More details awaited.

— ANI UP (@ANINewsUP) July 17, 2018दरम्यान, या भीषण घटनेत 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली नाही. उत्तर प्रदेशचे मंत्री महेश शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, सर्व जखमी तात्काळ आरोग्यसेवा देण्याचं काम आम्ही करत आहोत. एनडीआरएफचं मोठं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. एनडीआरएफच्या पथकाकाडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Trending Now