2019च्या निवडणूकीपूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करू - अमित शहा

2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीपूर्वी आयोध्येत राम मंदिर बांधकामाला सुरुवात केली जाईल असे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.

हैदराबाद, 14 जुलै : 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीपूर्वी आयोध्येत राम मंदिर बांधकामाला सुरुवात केली जाईल असे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपा राम मंदिरचा मुद्दा घेऊन निवडणूकीत उतरणार हे स्पष्ट आहे. 2014 च्या निवडणूकीत भाजपाने राम मंदिर आयोध्येत बांधू असे अश्वासन दिलं होते आणि आता निवडणुकांच्या तोंडावर याची अमलबजावणी होणार असं दिसतं आहे.काल हैदराबादमध्ये आमित शाह यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत राम मंदिर 2019 च्या निवडणूकीपूर्वी बांधण्यास सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले. सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राम मंदिर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.VIDEO पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्रीही उभे राहिले जेवणाच्या रांगेत

आदित्यनाथ यांनी संत समुदायाला धीर बाळगण्याचं आवाहन केलं. काही दिवस संयम बाळगा. प्रभू रामाची कृपा झाल्यावर राम मंदिराची उभारणी होईल, असं आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. आणि आता अमित शहा यांनही राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरूवात करू असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे आता राम मंदिराचा वाद पुन्हा एकदा पेटणार आहे. पण यावर आता काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं आहे.हेही वाचा...आंबे वक्तव्य भोवलं, संभाजी भिडे दोषी !ट्विटरच्या 'या' निर्णयामुळे मोदींपासून ते बराक ओबामापर्यंत सगळ्याचे फॉलोअर्स झाले कमी

Trending Now