राहुल गांधींनी नेमका कुणाला मारला डोळा?

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अनपेक्षीत गळाभेटीने सगळ्यांनाच अनपेक्षीत धक्का बसला. पण खरी चर्चा सुरू झाली ती राहुल गांधींच्या डोळा मारण्याची.

Ajay Kautikwar
नवी दिल्ली,ता. 20 जुलै : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अनपेक्षीत गळाभेटीने सगळ्यांनाच अनपेक्षीत धक्का बसला. पण खरी चर्चा सुरू झाली ती राहुल गांधींच्या डोळा मारण्याची. मोदींची गळाभेट घेऊन राहुल आपल्या जागेवर बसत असताना सोनिया गांधींसहीत सर्वच काँग्रस खासदार टाळ्या वाजवत होते. राहुल गांधी आपल्या आसनावर बसले आणि त्यांनी डोळा मारत सहकाऱ्याला खूणावलं. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती राहुल गांधींच्या डोळा मारण्याची. राहुल गांधी यांनी नेमका कुणाला डोळा मारला याची. सोशल मीडियावरची राहुल चर्चा होती ही राहुल यांच्या गळा आणि डोळा भेटीची अनेकांनी प्रिया वारिय आणि राहुलच्या डोळा मारण्याचीही तुलना केली.

नरेंद्र मोदींवरच्या आरोपात तथ्य, शिवसेनेच्या अडसुळांनी दिला राहुल गांधींना पाठिंबा

राहुल गांधींचा मास्टर स्ट्रोक : 'गळा भेट' आणि 'डोळा भेट'

कशी झाली गळा भेटराहुल गांधींनी भाषणात प्रेम आणि व्देषाचा मुद्दा उपस्थित केला. मी नरेंद्र मोदींवर कठोर टीका केली मात्र त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. तुम्ही मला पप्पू म्हणा किंवा आणखी काहीही म्हणा मला तुमच्याबद्दल आदरच आहे. मात्र माझ्याबद्दल तुमच्या मनात व्देष भरला आहे. कमालीचा व्देष भरला आहे. असं म्हणत राहुल गांधी आपल्या आसनावरून चालत पंतप्रधानांच्या आसनाकडे गेले आणि त्यांनी पंतप्रधानांची गळाभेट घेतली. राहुल गांधींच्या या अनपेक्षीत कृतीनं सर्व सभागृह आश्चर्यचकीत झालं. राहुल काय करत आहेत ते मोदींनाही काही क्षण समजलच नाही. नंतर राहुल गांधी परत जाताना मोदींनी त्यांना बोलवून घेतलं आणि पुन्हा हस्तांदोलन करत काही वाक्य ते बोलले. नंतर राहुल आपल्या आसनावर बसल्यानंतर त्यांच्या चेहेऱ्यावर हास्य होतं. त्यांनी काही सहकाऱ्यांना डोळाही मारला, काय कमाल केली असा भाव त्यांच्या चेहेऱ्यावर होता. राहुल गांधींच्या या धक्का तंत्राने मात्र सगळ्यांनाच धक्का दिला. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पप्पू ते हिंदुत्व, राहुल गांधींच्या भाषणातले महत्त्वाचे 16 मुद्दे

VIDEO : राहुल गांधींच्या 'जादू की झप्पी'ने मोदींना धक्का!

Trending Now