'जिसे बुलावा आता है, वही जाता है' राहुल गांधी कैलास मानसरोवरला पोहोचले

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी कैलास मानसरोवरला पोहोचले आहेत. तिथे पोहोचल्यावर राहुल गांधींनी ट्विट करून माहिती दिलीय.

नवी दिल्ली,ता.5 सप्टेंबर : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी कैलास मानसरोवरला पोहोचले आहेत. तिथे पोहोचल्यावर राहुल गांधींनी ट्विट करून माहिती दिलीय. 'जिसे बुलावा आता है, वही कैलाश जाता है' असं ट्विट राहुल यांनी केलंय. इथं आल्यावर मला खूप आनंद झालाय. या सुंदर यात्रेत मला जे अनुभव येतील ते मी सगळ्यांना सांगणार आहे असं जाहीर करत राहुल गांधींनी कैलास मानसरोवरचे काही फोटोही ट्विट केले केलेत. 31 ऑगस्टला राहुल गांधी मानसरोवर यात्रेसाठी रवाना झाले होते. मानसरोवर सरोवराचे फोटोही राहुल यांनी ट्विट केलेत आणि लिहिलंय. मानसरोवरचं पानी शांत आहे. ते फक्त देत असतं, तिथं काहीच गमावण्यासारखं नाहीये. इथं कुठल्याही तऱ्हेचा व्देष नाहीये. याच कारणांमुळे भारतात जलपूजन केलं जातं.

यात्रेला निघण्याच्या दिवशीही राहुल गांधी यांनी हा संस्कृत मंत्र ट्विट केला होता. ॐ असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतम् गमय। ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥

राहुल गांधी हे पहिले नेपाळला गेले तिथून चीन मार्गे ते मानसरोवरला गेले आहेत. काठमांडूला गेल्यावर त्यांच्या जेवणावरून वादही झाला होता. मात्र नंतर हॉटेल प्रशासनानं त्यावर स्पष्टीकरण देत राहुल यांनी नॉन व्हेज खाल्लं नाही असं स्पष्ट केलं. मात्र भाजपने संधी साधत त्यावर टीकाही केली होती.कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीदरम्यान त्यांनी या यात्रे याबाबतची घोषणा केली होती. तर अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्या अधिवेशनातही त्यांनी यात्रेला जाण्यासाठी कार्यकर्त्यांना परवानगी मागितली होती. मी 15 दिवसांची सुट्टी घेणार आहे आणि कैलास मानसरोवर यात्रेला जाणार आहे असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं.कर्नाटक विधानसभेच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळं भरकटलं होतं. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. याचा संदर्भ देत राहुल यांनी सांगितलं होतं की त्या घटनेनंतर त्यांच्या मनात मानसरोवर यात्रेला जाण्याची इच्छा झाली होती.VIDEO : Teachers Day - आयुष्याला दिशा देणाऱ्या थोर शिक्षकांचे 6 विचार

Trending Now