राफेल खरेदीत मोदींनी घोटाळा केला, राहुल गांधींचा आरोप

"नरेंद्र मोदी स्वत: पॅरिसला जाऊन त्यांनी राफेल खरेदीचा करार बदलला"

Sachin Salve
06 फेब्रुवारी : राफेल विमान खरेदीत मोदी सरकारने मोठा घोटाळा केलाय, या खरेदीसाठी नरेंद्र मोदी पॅरिसला गेले होते. त्यांनी या करारात फेरफार केला असा गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय.संसद भवनात पत्रकारांशी संवाद साधत असताना राहुल गांधी यांनी मोदी सरकावर हल्लोबोल केला. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी राफेल लढाऊ विमान खरेदीची रक्कम जाहीर करण्यास नकार दिलाय. याचं काय कारण आहे ?, याचा अर्थ भाजपने यात घोटाळा केलाय. नरेंद्र मोदी स्वत: पॅरिसला जाऊन त्यांनी राफेल खरेदीचा करार बदला. संपूर्ण देशाला ही बाब माहिती आहे. पण सरकार यावर बोलायला तयार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांवर टीका केलीये. तुम्ही लोकं का घाबरताय ?, तुमच्यावर दबाव असेल पण सत्य बाहेर आलं पाहिजे. त्याचा तुम्ही साथ दिला पाहिजे असा सल्ला राहुल गांधींनी मीडियाला दिला.

लोकसभेत पहिल्यांदा असं घडलंय की सरकारने उत्तर देण्यास नकार दिलाय. यासाठी राहुल गांधींनी टि्वट करून #TheGreatRafaleMystery हॅशटॅग वापरण्यास आवाहन केलंय.मात्र, याआधी निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत फ्रांससोबत झालेल्या करारामुळे राफेल खरेदीची माहिती जाहीर करता येत नाही अशी माहिती दिली होती.

Trending Now