'राफेल' डिल नव्हे घोटाळाच - प्रियंका चतुर्वेदी

राफेल लढाऊ विमानं खरेदीसाठी फ्रन्सबरोबर करण्यात आलेला करार हा करार नसून घोटाळाच असल्याचं काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलंय.

नागपूर, 12 ऑगस्ट : राफेल लढाऊ विमानं खरेदीसाठी फ्रन्सबरोबर करण्यात आलेला करार हा करार नसून घोटाळाच असल्याचं काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी नेहमी रोजगार निर्मिती बद्दल बोलतात. लढाऊ विमानं निर्मितीचे कंत्राट जर हिन्‍दुस्‍तान एरोनॉटिक्‍सला दिलं असतं तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती. राफेल लढाऊ विमान निर्मितीसाठी झालेला करार याच सरकारला रद्द करावा लागेल असंही त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं.2015 मध्ये भारताने फ्रान्सकडून 36 राफेल विमानं खरेदी करण्यासाठी करार केला होता. हा करार करताना 36 पैकी काही विमानं भारतात बनतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता तसं न करता ते सर्वच्या सर्वच फ्रान्सकडून तयार करून घेतले जाणार आहेत. या कराराचा फायदा भारताला व्हायला हवा होता. लढाऊ विमान निर्मितीची जी कंपनी काही दिवसांपूर्वी सुरू झालीये, तीलाच हे कंत्राट देण्यात आले आहे. भारतासाठी ही अत्यंत लार्जिवाणी बाब असल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी नेहमी रोजगार निर्मिती बद्दल बोलतात. लढाऊ विमान निर्मितीचं हे कंत्राट जर हिन्‍दुस्‍तान एरोनॉटिक्‍सला दिलं असतं, तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती. लढाऊ विमान निर्मिती ही आपल्याच देशातच व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. भारताने फ्रान्ससोबत केलेला हा करार नव्हे तर घोटाळा असून, लवकरच ते भाजप सरकारलाच रद्द करावे लागेल असेही त्या म्हणाल्या.

देशात जे युतीचे सरकार बनेल ते सक्षम सरकार असायला हवे. काँग्रेस त्यासाठी प्रयत्न करत आहे. देशाच्या विकासाला आणि सुरक्षेला प्रथम प्राधान्य केवळ काँग्रेसचं 'सव्वा रूपयां'चा डाग पुसण्यासाठी पठ्ठ्याने लढली आणि जिंकली 26 वर्षांची लढाई!दारू विक्रीचं 'कॉल सेंटर' उद्धवस्त, 50 वाईन शॉप सीलसूर्याच्या सगळ्यात जवळ जाणारं नासाचं 'सोलर प्रोब' अवकाशात झेपावलं !  

Trending Now