कुमारस्वामींच्या पत्नी राधिका झाल्या गुगलवर जास्त सर्च

त्यांची बायको राधिका गुगलवर ट्रेंड झाल्यात. राधिका कुमारस्वामी प्रसिद्ध तामिळ अभिनेत्री आहे.

Sonali Deshpande
बंगळुरू, २० मे : सध्या सगळीकडे जेडीएस नेता कुमारस्वामींची चर्चा सुरू आहे. पण त्याचबरोबर त्यांची बायको राधिका गुगलवर ट्रेंड झाल्यात. राधिका कुमारस्वामी प्रसिद्ध तामिळ अभिनेत्री आहे.राधिका कुमारस्वामींना गेल्या चार दिवसांत कुमारस्वामींपेक्षा गुगलवर जास्त सर्च केलंय. राधिका या अभिनेत्री आणि निर्मात्याही आहे. आतापर्यंत त्यांनी ३२ सिनेमांमध्ये काम केलंय.सन २०००मध्ये राधिका आणि कुमारस्वामी यांनी रतन मंदिरात लग्न केलं. हे लग्न कोणालाच सांगितलं गेलं नाही. त्यावेळी राधिका १४ वर्षांच्या होत्या. नंतर काही वर्षांनी त्यांनी लग्नाची घोषणाही केली. आता दोघांना एक मुलगीही आहे.

Trending Now