पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर

सकाळी साधारण १०:३० च्या सुमारास सुरत विमानतळावर आगमन होणार

गुजरात, २३ ऑगस्ट- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. आज ते चार कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हसिटीच्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यानंतर ते जुजवा येथे जनसभेला संबोधित करणार आहेत. सकाळी साधारण १०:३० च्या सुमारास सुरत विमानतळावर आगमन होणार आहे. यानंतर ते जुनागढला भेट देणार आहेत. संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यानंतर राजभवनमध्ये होणाऱ्या बैठकीत ते  सहभागी होणार आहेत. सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर रात्री ९ वाजता अहमदाबाद विमानतळावरुन दिल्लीला प्रयाण करतील.दरम्यान, बुधवारी मनसे अंध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेत मोदी यांचा समाचार घेतला.  धोनी धोनी प्रमाणे मोदी मोदी ओरडलात, घोषणा दिल्या. पण मोदींनी पहिली कुऱ्हाड व्यापाऱ्यांवरच मारली ना असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या जैन बांधव संवाद मेळाव्यात ते बोलत होते. पुण्यात जैन बांधव संवाद मेळाव्यात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्यांवरून वेगवेगळ्या गटांना कानपिचक्या दिल्यात. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली. जैन लोकांच्या वेगळ्या सोसायट्या नकोत, अशाने देश विभक्त होतो असंही ठाकरे म्हणाले.काही दिवसांपूर्वी जैन मुली भाजपचा प्रचार करत असल्याची क्लिप व्हॉटस्अॅपवर पाहिली. पण तुम्ही मुनी आहात ना मग पक्षाचा प्रचार कशा करतात. हा जाब तुम्ही विचारला पाहिजे असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. दांडिया आम्हीही खेळतो म्हणत नाही. पण गुजराती आहे म्हणून मोदी अमेरिकेत गेले ओबामांना भेटल्यावर विचारलं केम छो. तुम्हाला आवडलं असेल. पण मला नाही आवडलं . राम राम म्हटलं तरी आवडलं नसतं.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कधी सत श्री अकाल म्हटलं का ?, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, कुण्या एका राज्याचे किंवा धर्माचे नाही असा टोलाही राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लगावला. प्रत्येक समुदायाच्या वेगळ्या इमारती, सोसायटी झाल्या तर मग भारत या संकल्पनेचं काय होणार? असा मार्मिक सवालही राज ठाकरेंनी उपस्थितीत केला.

VIDEO : 'आधी खूप भीती वाटली,पण हिंमत केली'!

Trending Now