एअर मार्शल अर्जन सिंग यांना राष्ट्रपतींनी वाहिली आदरांजली.

त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सिंग यांच्या निवासस्थानी राष्ट्रपती आले होते. त्यांच्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनीही सिंग यांना पुष्पांजली अर्पण केली.

Chittatosh Khandekar
17 सप्टेंबर: भारतीय वायुदलाचे एअर मार्शल अर्जन सिंग यांचं काल निधन झालं. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्जन सिंगांना आदरांजली वाहिली.त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सिंग यांच्या निवासस्थानी राष्ट्रपती आले होते. त्यांच्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनीही सिंग यांना पुष्पांजली अर्पण केली. अर्जन सिंग यांना वायुदलाकडून मार्शल ही पदवी दिली गेली होती. आर्मीतील फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या पदासारखंच हे पद आहे. या पदामुळे तहहयात गणवेश धारण करता येतो.अर्जन सिंह हे १९६९ साली वायुदलातून निवृत्त झाले. १९६५च्या युद्धात ते वायुदलाचे प्रमुख होते. त्यांनी त्याकाळी वायुदलात अनेक चांगले बदल केले. ते उत्तम पायलट होते. सेवेत असताना त्यांनी ६० प्रकारची लढाऊ विमानं उडवली होती. मार्शल हे पद बहाल केलेले ते एकमेव वायुदलातले अधिकारी आहेत.  याआधी माजी लष्कर प्रमुख जनरल करियप्पा आणि जनरल सॅम माणेकशॉ यांना असंच पद दिलं गेलं होतं. २०१६ साली वायुदलानं पश्चिम बंगालमधल्या पानागड तळाचं नाव एअर फोर्स स्टेशन अर्जन सिंग असं ठेवलं होतं.

 

Trending Now