२०१४ ते २०१८ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असा होता मोदींचा स्टायलिश लूक

देशभरात आज स्वातंत्र्य दिवसाचे जंगी सेलिब्रेशन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत देशाला संबोधित केले. दर वर्षी १५ ऑगस्टला मोदी नव्या अंदाजात पाहायला मिळतात. यावर्षी मोदींनी सफेद कुर्ता, पायजम्यासह भगव्या आणि लाल रंगाचा बांधणीचा फेटा बांधला होता. कुर्ती- पायजम्यासह लाल काट असलेला बांधणीचा केशरी रंगाचा फेटा त्यांच्यावर खुलून दिसत होता. चला तर मग २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून २०१८ पर्यंत मोदींचे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कसे लूक होते यावर एक नजर टाकू... २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता. यावेळी मोदी यांनी लाल, हिरवा आणि पिवळ्या रंगाचा बांधणीचा फेटा घातला होता. २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे लाल किल्यावरील पहिले भाषण होते. यावेळी देशाला संबोधताना ते म्हणाले की, आज मी इथे एक पंतप्रधान म्हणून आलेलो नाही तर एक सेवक म्हणून आलो आहे. मी देशाचा पंतप्रधान नसून प्रथम सेवक आहे.

२०१५ मध्ये मोदी यांच्या लूकची चर्चा खूप झाली. मोदी यांनी सोनेरी रंगाचा कुर्ता- पायजमा घातला होता. या कुर्तीला साजेशी त्यांनी मस्टड रंगाचा फेटा घातला होता. याच वर्षी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी खास किसान कल्याण योजना आणि पंतप्रधान कृषी सिंचन योजना सुरू केली होती. २०१६ मध्ये १५ ऑगस्टच्या दिवशी पुन्हा एकदा लूक बदलून मोदी यांनी अनेकांना आश्चर्य चकीत केले. यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाच्या कपड्यांवर रंगीबेरंगी फेटा बांधला होता. यावर्षी त्यांच्या भाषणाचा मुख्य मुद्दा हा परदेश राजनिती आणि पाकिस्तानसोबतचे मुद्दा होता. पेशावर हल्ल्यासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले होते की, जेव्हा पेशावरमधील शाळेमधील लहान मुलांची हत्या करण्यात आली, तेव्हा भारतातील प्रत्येक शाळा रडली होती. प्रत्येक नेत्याच्या डोळ्यात अश्रू होते. असे असूनही पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसायला थकत नाही. २०१७ मध्ये मोदीं पुन्हा एकदा लाल आणि पिवळ्या रंगाचा फेटा घातला होता. या फेटेला साजेसा असा फिकट पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढर पायजमा घातला होता. यावर्षी २०१८ मध्ये मोदी यांनी पांढरा कुर्ता पायजमा आणि त्यावर केशरी लाल रंगाचा बांधणीचा फेटा घातला होता. यावर्षी त्यांच्या भाषणाचा मुद्दा हा देशाचा विकास होता. भविष्यातील भारत हा गरिबांचा आणि शेतकऱ्यांचा भारत असेल असे त्यांनी म्हटले. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांची मिळकत दुप्पट होण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Trending Now