भारत बंदनंतर आजही इंधनाचे दर भडकले, परभणीत पार झाली नव्वदी

राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे जनआक्रोश सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आजही ही दरवाढ कायम आहे.

मुंबई, 11 सप्टेंबर : राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे जनआक्रोश सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आजही ही दरवाढ कायम आहे. आज मुंबईत पेट्रोल 88.12 तर डिझेल 77.47 रुपये प्रतिलीटर तर नवी मुंबईत पेट्रोलचा दर 88.26 रुपयांवर आहे तर डिझेल 77.47 रुपयांवर आहे. आज पेट्रोल 14 पैसे तर डिझेलच्या दरातही 15 पैशांनी वाढ झाली आहे. याहूनही धक्कादायक म्हणजे आज सगळ्यात महाग दर हे परभणीत आहेत.परभणीत सगळ्याच शहरांमध्ये इंधनाच्या दरांनी नव्वदी पार केली आहे. सोलापूरमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. या वाढत्या इंधनदरामुळे सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. बरं त्यात फक्त इंधन नाही, तर भाजीपाला आणि फळांपासून ते सगळ्याच जीवनावश्यक वस्तू महागल्या आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांची सहनशीलता शिगेला गेली आहे असंच म्हणावं लागेल.भारत पेट्रोलियम     इंडियन ऑइल         हिंदुस्थान पेट्रोलियम

पेट्रोल : 90:13          पेट्रोल: 90:02            पेट्रोल: 90:11डिझेल: 78:07           डिझेल: 77:98           डिझेल: 78:06आज महाराष्ट्रभरात इंधनाचे दर असेच भडकले आहेत.सोलापूर- पेट्रोल :  89.31 रुपये- डिझेल : 78.09 रुपयेनांदेड- पेट्रोल :  89.87 रुपये- डिझेल : 77.84 रुपयेअकोला- पेट्रोल :  88.34 रुपये- डिझेल : 76.38 रुपयेवर्धा- पेट्रोल :  88.56 रुपये- डिझेल : 76.40 रुपयेउस्मानाबाद- पेट्रोल :  89. 8 रुपये- डिझेल : 77.9 रुपयेधुळे- पेट्रोल :  88.22 रुपये- डिझेल : 76.25 रुपयेदरम्यान, काल काँग्रेस, मनसेसह 21 पक्षांनी भारत बंदचा इशारा दिल्यानंतर देशभरात इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. पण या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी इंधनाचे भाव आणखी भडकले आहेत. या सगळ्यावर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतेय. पेट्रोल आणि डिझेल दरवाढ आणि वाढणारी महागाई या विषयावर मंत्रिमंडळात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.  राज्यात पडलेला कमी पाऊस हा देखील आजच्या बैठकीचा चिंतेचा विषय असणार आहे. PHOTOS : देशाचा प्रमुख हा राजा असावा, व्यापारी नसावा!;राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

Trending Now