#News18RisingIndia-मोदी उत्तम अर्थव्यवस्थापक पण नोटाबंदी हे पाऊल मुर्खपणाचं-पॉल क्रुगमन

पॉल क्रुगमन हे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ आहेत. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्याशी केली आहे.

Chittatosh Khandekar
19 मार्च:  जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ  पॉल क्रुगमन News18risingindia समिट या कार्यक्रमात  क्रुगमन  यांनी  मोदी यांच्या अर्थव्यवस्थापनाचं कौतूक केलंय.पण त्याचवेळी नोटाबंदी हे पाऊलं  मुर्खपणाचं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.पॉल क्रुगमन हे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ आहेत. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्याशी केली आहे. दोघंही राष्ट्रवादी  उत्तम  आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं. मोदींच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या भारताकडे आता उगवती आर्थिक महासत्ता म्हणून पाहिलं जातं आहे असं त्यांनी सांगितलं.  भारत एक सेमीसुपरपॉवर झाला आहे असंही ते म्हणाले.  तसंच आजच्या भारतामध्ये जगाला बदलण्याची क्षमता आहे असंही त्यांनी सांगितलं. देशातले प्रश्न सोडवण्यासाठी स्थलांतर आणि गुंतवणूक या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं त्यांनी सांगितलं. मोदींनी हाती घेतलेल्या विद्युतीकरणाच्या धोरणाचं कौतूकही त्यांनी केलं.त्याचवेळी भारताने निर्मिती क्षेत्रावर भर द्यायला हवा असंही त्यांनी सांगितलं.

Trending Now