आता सीएसटी परिसरात जुन्या रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये बसून घ्या रेस्तराँचा आनंद

रेल्वे रेस्तराँ संकल्पना प्रवाशांप्रमाणेच मुंबईकर, पर्यटकांना वेगळा अनुभव देण्यात यशस्वी ठरेल

मुंबई, २३ ऑगस्ट- लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेसमधून जाताना सहकुटुंब, मित्रांसह भोजनाचा आनंद घेण्याच्या क्षणांचा पुन्हा आनंद घेण्यासाठी रेल्वेनेच नवीन रेस्तराँ सुरू करण्याचे ठरवले आहे. जुन्या एसी डब्यांना रेस्तराँचे स्वरूप देण्याच्या रेल्वे मंत्रालयाची सूचना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने अंमलात आणण्याचे ठरवले आहे. त्याप्रकारचे रेस्तराँ पी. डी. डिमेलो मार्गावरील रेल्वेच्या जागेत लवकरच खुले होण्याची चिन्हे आहेत.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात रेल्वे रेस्तराँ सुरू करण्याची योजना आयआरसीटीसीने हाती घेतली आहे.रेल्वे रेस्तराँ संकल्पना प्रवाशांप्रमाणेच मुंबईकर, पर्यटकांना वेगळा अनुभव देण्यात यशस्वी ठरेल, असे आयआरसीटीसीचे म्हणणे आहे. या रेस्तराँसाठी जुन्या आणि सेवेतून बाद झालेल्या वातानुकूलित डब्याचा वापर केला जाणार आहे. त्याची क्षमता ५० पर्यंत असेल, असेही सांगण्यात येते. या रेस्तराँबाहेर बसूनही खाद्यपदार्थांचा आनंद घेता येणार आहे. रेस्तराँसाठी खासगी स्तरावर कंत्राटदाराची मदत घेतली जाणार आहे.

Trending Now