सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 60 वर्षे?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचं वय 58 वरून 60 करावं, याबाबतचा अहवाल लवकरच सरकारला सादर होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. माजी सनदी अधिकारी बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली समितीने आपला अहवाल पूर्ण केलाय.

Sonali Deshpande
27 सप्टेंबर : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचं वय 58 वरून 60 करावं, याबाबतचा अहवाल लवकरच सरकारला सादर होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. माजी सनदी अधिकारी बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली समितीने आपला अहवाल पूर्ण केलाय. निवृत्तीचं वय काही अटी ठेवून वाढवता येऊ शकतं, असा सकारात्मक अहवाल समितीने तयार केल्याचं सूत्रांनी सांगितलंय.काय आहेत शिफारसी?- निवृत्तीचं वय वाढविल्यास नवीन भरतीसाठीच्या निधीची बचत

- कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा सरकारला फायदा- पण नवीन भरती थांबल्यास तरुण रोजगारपासून वंचित- नवीन भरती थांबल्यास तरुणांमध्ये रोष वाढेल- मानसिक, शारीरिक आजार असलेल्यांना मुदतवाढ नको- चौकशी, भ्रष्टाचाराबाबत खटले सुरू असलेल्यांना मुदतवाढ नको

Trending Now