संसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य

कास्टिंग काऊच संस्कृती ही फक्त बॉलिवूड पुरतीच मर्यादीत नाही तर संसदही त्यापासून अपवाद नाही असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनी केलंय.

Ajay Kautikwar
नवी दिल्ली,ता.24 एप्रिल : कास्टिंग काऊच संस्कृती ही फक्त बॉलिवूड पुरतीच मर्यादीत नाही तर संसदही त्यापासून अपवाद नाही असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनी केलंय.सरोज खान यांच्या वक्तव्यावर त्या प्रतिक्रीया देत होत्या.कास्टिंग काऊच हे बॉलिवूडमधली सामान्य घटना असून अनेकांची रोजी रोटीच त्यावर अवलंबून आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. संसद किंवा कुठलही कार्यालय याला अपवाद नसून देशाला या अपप्रवृत्तीबद्दल लढावं लागेल. #MeToo हे कॅम्पेन पुन्हा एकदा चालवावं लागेल असंही त्या म्हणाल्या.

रेणुका चौधरींच्या या वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं असून राजकारणातही असे प्रकार घडतात का यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

Trending Now